ShraddhaVivah
About Us
!! श्रद्धा परिवाराकडून आपले सहर्ष स्वागत !!
    ’ विवाह ’ प्रत्येक घरांमधील जिव्हाळ्याचा विषय !! पुर्वी जिव्हाळ्याचा विषय जिव्हाळ्याने सोडवण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये वडिल धा-यांची फौजच्या फौज तयार होती. शब्दाला वजन होते.विवाह इच्छुकांचीही संख्या तशी मर्यादीतच होती . मात्र , सध्या धावपळीचं युग , नोकरी , व्यवसायामुळे झालेल स्थलांतर मुळ नात्याशी , समाजाशी तुटलेली नाळ , शिक्षणामुळे मुलामुलींच्या वाढलेल्या अपेक्षा. वाढते शहरीकरण, बंदिस्त प्लॅट पद्धती त्यामुळे अपेक्षित स्थळांपर्यंत पोहचणं दिवसेंदिवस अशक्य होत आहे.आजरोजी प्रत्येकजणआपल्या परीने प्रयत्नशील असतोच मात्र अपेक्षांची सांगड घालताना दमछाक होते.मात्र आमच्या संकेतस्थळाव्दारे सामान्यातल्या सामान्य घटकाला या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.अत्यंत माफक देणगी शुल्कामध्ये www.shraddhavivah.org हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे.आशा वाटते .....की कमी वेळेत कमी श्रमात , कमी खर्चात अपेक्षीत स्थंळ उपलब्ध होणेसाठी याचा निश्चितच उपयोग होईल. एकाच वेळी असंख स्थळं पाहता येतील.अपेक्षित स्थळांपर्यंत सहज पोहचण अशक्य झाल होत . मात्र , "श्रद्धाविवाह " माध्यमातून जसं हवं तस स्थळ सहज निवडता येऊन वडील धा-यांशी मनमोकळी चर्चा करुन स्वबळावर सन्मानाने अपेक्षित स्थळांपर्यंत सहजच पोहचण शक्य होईल अशी आशा वाटाते. मुलामुलींचे फोटो पाहुन जाडाजोडा ठरवता यावा, पत्रिका पाहता यावी ह्या गोष्टीचा विचार करुन श्रद्धा परिवाराने www.shraddhavivah.org ही स्वतंत्र वेबसाईट बनवली आहे. सर्चसामान्य आर्थिक दुर्बल वधुवरांसाठी अत्यंत माफक देणागी शुल्कामध्ये जास्तीत जास्त स्थळे पाहता यावीत ह्यासाठी आम्ही केलेला हा प्रामाणिक प्रयत्न .